बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,किरण आखाडे
२६.०७.१९
कडा- ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अमोलोक जैन विद्यालय प्रसारक मंडळ कडा येथे सुरेश धस मित्र मंडळ यांच्या वतीने शिबराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरास मा.जयदत्तभाऊ धस यांच्या सह पिंटू शेठ रमजान तांबोळी, माजी सभापती शिवराज भिमराव पाटील, गावचे सरपंच अनिल तात्या ढोबळे, उपसरपंच योगेश शेठ भंडारी, आंसार सय्यद व ग्रामपंचायत सर्वच पदाधिकारी उपस्थित प्रत्येकाने रक्तदान केले. रक्तदान हे अनमोल असं दान आहे आतापासून जवळजवळ शकंडो जणांनी रक्तदान केले आहे तालुक्यातील सरपंच सभापती ग्रामपंचायतचे सदस्य कार्यकर्ते नेते पदाधिकारी सगळ्यांनीच रक्तदान देऊन ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



















