सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, दिपक माने
दि.२८.०७.१९
पाटण- मौजे कराटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील विद्युत पोलची बातमी वाचून त्या बातमीतील फोटो पाहताच कुणाच्याही मनात संताप निर्माण झाल्याखेरीज राहणार नाही. कारण हा जो गंजून उभा दुभंगण्याच्या स्थितीत असणारा जो पोल आहे तो कोणच्या घराच्या मिटर कनेक्शनचा पोल नसून या पोलवरून ३३ KV वीज प्रवाह दैनंदिन चालू असून जर ह्या पोल मुळे नुकसान झालेच तर ते “न भुतो न भविष्यती” अशा स्वरूपाचे नुकसान होवू शकते. आणी आत्ताच्या तांत्रिक सुविधेनुसार जेव्हा दोन विद्युत प्रवाहित वाहिन्या एकत्रित आल्यास शॉर्ट होवून कनेक्शन आपोआप बंद होते असा जरी कोणी युक्ती वाद केला तरी सुध्दा हा पोल त्या वायरसह जेव्हा खाली पडेल तेव्हा त्याखाली जो माणूस किंवा जेवढी माणसे अथवा जनावर किंवा जनावरे यापैकी कोणीही येईल ते जीवंत राहणे शक्यच नाही. आणी या पोलच्या बाजूलाच म्हणजे ज्या दिशेला हा पोल पडू शकतो त्या दिशेलाच शाळेची इमारत आणी इमारतीसमोर पटांगण व इमारती शेजारी शाळेत येणे जानेचा जो मार्ग आहे त्या मार्गातच हा पोल सहज पडू शकतो अशा स्थितीत हा पोल असल्यामुळे शाळेकडून संबंधीत वीजवीतरण कार्यालयाकडे दि २८जून१९ रोजी रीतसर तक्रार अर्ज दाखल करूनही सदर कार्यालयाकडून कोणतीही दखल घेतल्या गेली नाही म्हणून मौजे कराटे गावच्या ग्रामपंचायतीने स्वतः मा.सरपंचांच्या सही शिक्या निशी दि.१०जुलै१९ रोजी रीतसर पोल बाबत संभाव्य धोक्याची लेखी समज देवूनही आज अखेर या वीजवीतरण कंपनीने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही.
ही साधी सुधी बाब नसून अतिशय गंभीर स्वरूपाची निषेधपात्र अमानुष व अतिशय निंदनीय कृत्याची बाब म्हणावी लागेल या बाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणेत यावेत व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधास कारणीभूत परिस्थिती निर्माण केल्याच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांमधून केली जात आहे.त्यातूनही संबंधित कर्मचाऱ्याच्या मुलाबाळांचा विचार करता जर तातडीने पोल बदलले गेला नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या वर सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्या गावचे ग्रामस्थांनी अधिकृतरित्या कळविण्यात आले असल्याची माहिती निर्भिड पत्रकार प्रतिनिधीशी बोलताना दिली.



















