सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.२२.०९.१९
पाटण- तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे एकनिष्ठ युवा नेते भारतीय बौद्ध महासभा मोरणा विभागाचे माजी अध्यक्ष तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पाटण तालुका सचिव व वंचित बहुजन आघाडी भारीप युवक आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सचिन कांबळे यांना पाटण तालुक्यातील युवक, जेष्ठ कार्यकर्ते यांचा मोठ्या प्रमाणात दांडगा जनसंपर्क असल्यामुळे सर्वांकडून विधानसभेसाठी तयारी करण्यासाठी युवकांकडून जेष्ठ कार्यकर्त्यांकडून व बहुजन बारा बलुतेदार समाजातील काही कार्यकर्त्यांचा यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा देण्यात आला आहे.पाटण तालुक्यातील युवकांचे आशा स्थान तरुण तडपदार नेतृत्व बहुजन समाजातील सर्व लोकांच्या अडीअडचणींना त्यांच्या समस्यांना प्रत्येक पावलावर तोंड देवून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम स्वरूपी तत्पर असलेल कार्यक्षम नेतृत्व सचिन कांबळे यांना बहुजन समाजातील बलुतेदार यांचा गट तट सोडून आपला पाठिंबा उभा राहील असे बहुजन समाजातील काही कार्यकर्त्यांनी जाहीर पाठींबा दर्शवला आहे.
गेल्या विधानसभा २०१४ रोजी सचिन कांबळे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केला होता सचिन कांबळे यांचा पाटण तालुक्यात मोठा जनसंपर्क असून ते बहुजन चळवळीचे पारदर्शक तालुक्यामध्ये नेतृत्व करत आहेत.सचिन कांबळे म्हणाले विधानसभा पाटण तालुका निवडणुकीसाठी अजून वेळ आहे.त्यावर विचार केला जाईल आपला असाच पाठींबा असावा त्याशिवाय बहुजन समाजाच्या चळवळीचे अस्तित्व टिकण्यासाठी काही निर्णय ज्या त्या वेळेस घेतले जातील.



















