सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, दि.२४.०९.१९ सातारा- शरद पवार यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे, होता आणि राहील. साताऱ्यातून ते लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले तर मी निवडणूक लढणार नाही असे साताऱ्याचे माजी खासदार उदयन राजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.विधान सभेच्या निवडणुकांत बरोबरच सातारा लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूक २१ ऑक्टोबरला होणार आहे. निवडणूक आयोगाने तशी घोषणा आजच केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी जोरदार मोर्चेबांधणी चालवलेली आहे आणि खुद्द शरद पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार साहेबांबद्दल बद्दल कालही आदर होता,आजही आहे आणि उद्याही राहील असे सांगताना ते भावुक झाले.पवार साहेब निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी लढणार नाही अर्ज भरणार नाही पण दिल्लीतील बंगला आणि गाडीसाठी मला मुभा द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.



















