सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
पाटण- विधानसभा मतदार संघात नव्याबदलांना सुरुवात.पाटण तालुक्यात आणखी एका पक्षाचे आगमन होत असून या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष घटनातज्ञ मा.सुरेशजी माने हे असून या पक्षाचे नाव बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी असे असून सदर पक्षाचे पाटण तालुका अध्यक्ष मा.अनिल सीताराम माने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाटण विधानसभा मतदार संघातून यंदाच्या निवडणुकीत सर्व सामान्य घराण्यातील उमेदवार देणार असल्याचे सांगितले.याबाबत मा.अनिल सीताराम माने यांना आमच्या प्रतिनिधींनी असा प्रश्न केला कीं सर्व सामान्य अशा व्यक्तीला आपण उमेदवारी देण्याबाबत कसा काय विचार केलात तेव्हा या प्रश्नावर ते असे म्हणाले आजपर्यंत धनदांडग्यांनाच उमेदवारी देणेत आल्यामुळे पाटण तालुक्याचा विकास हा सर्व सामन्यांना अपेक्षीत असा झालेला नाही.
कारण ज्या प्रकारे गरीब आणी श्रीमंत सुशिक्षित आणी अशिक्षित ह्या सामाजिक दऱ्या आहेत त्याचप्रकारे धनदांडगे आणी सर्व सामान्य ही देखील एक सामाजिक दरी असल्यामुळे निवडून आलेला उमेदवार हा सर्व सामन्यांना आपला उमेदवार वाटतं नाही त्यामुळे ते आपल्या व्यथा त्याच्याजवळ खुल्या मनाने मांडत नाहीत कारण धनदाडंगे उमेदवार हे निवडणुकीला उभे राहिल्यावरच सर्व सामन्याच्या दारात हात जोडून मतं मागण्यासाठीच जातात ते सुद्धा तिथल्या कुटल्यातरी कार्यकर्त्यानेच बोलवावे लागते अन्यथा त्यांना मतदार मेला तरी मैततावर जात नाहीत आणी त्याच घरच सुखाचे कार्य जरी असले तरी त्याही कार्यात ते जात नाहीत.अशी स्थिती असल्यामुळे सर्व सामान्य माणूस सुद्धा आपली व्यथा सांगायला पण धनदांडग्या उमेदवाराकडे जात नाहीत हे या तालुक्याचे वास्तव आहे.त्यामुळे हा पक्षच मुळात सर्व सामन्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा व सर्व सामन्यांचाच असल्यामुळे या पक्षाचा आमदारकीचा उमेदवार सुद्धा सर्व सामान्यच असावा जेणे करून तो सर्वांना आपला वाटावा आणी सर्व सामन्यांची दैनिय अवस्था त्यांची दुःख त्यांची सुखं या साऱ्यातला तो बरोबरीचा हिस्सेदार असावा अशाच उमेदवाराला उमेदवारी देण्यात यावी या विषयाला बहुतांश मान्यता मिळाल्यामुळे हा मर्यादीत पाटण मतदार विधानसभा मतदार संघासाठीचा पाटण पँटर्न आहे इतर तालुक्यांमधे आम्ही या भुमिकेत नाही.



















