सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२५.०९.१९
फलटण- अलगुडेवाडी येथे असणार्या महाराष्ट्र फूडस् प्रोसेसिंग ऍण्ड कोल्ड स्टोरेज या कत्तलखान्यातील परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सोमेर सोहेबराव अली (वय २७) मूळ रा. फौजदार चर, ता. चाफर जि.दुबरी,आसाम हा कामगार गेल्या काही वर्षांपासून अलगुडेवाडी येथील कत्तलखान्यात कामाला होता. दरम्यान सोमेर याच्यावर अज्ञात संशयिताने धारदार शस्त्राने वार करुन त्याचा मृतदेह चिलरमध्ये टाकला होता.आज पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट दिली असून याबाबतचा अधिक तपास पो. नि. पोमन करीत आहेत.



















