सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२६.०९.१९
फलटण कोरेगाव मतदार संघाचे आ. दीपक चव्हाण यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नगरसेवक अनुप शहा यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला केली आहे.पोलिस स्टेशनला त्यांनी लेखी निवेदन दिले आहे. काल बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी आ. दीपक चव्हाण यांनी जमाव जमून फलटण शहरात दहशत माजवून जबरदस्तीने व्यापारी बंद करायला लावला. वास्तविक पाहता आचारसंहिता सुरू असलेले जमाव जमवणे पदयात्रा करणे यासाठी योग्य ती परवानगी घेणे आवश्यक आहे. तशी परवानगी न घेतल्याने आ. दीपक चव्हाण आणि भाऊ कापसे यांनी समाज माध्यमावर केलेले आवाहन विचारात घेऊन या दोघांसह राजे ग्रुप वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार नगरसेवक अनुप शहा यांनी फलटण पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.



















