सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२९.०९.१९
फलटण- महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.३०सप्टेंबर दुपारी २ वाजता अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे फलटण, कोरेगाव तालुक्यातील युवक व कार्यकर्ते यांच्या सहभागाने युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात श्रीमंत रामराजे,श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे हे या युवा मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या युवा संवाद मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.



















