चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०९.१९
चिमूर- तालुक्यातील ताडोबा बफर झोन लगत असलेल्या आदिवासी बहूल गाव मौजा पळसगांव(पीपर्डा)येथील सांस्कृतिक भवनाचे काम गेल्या तबल पाच वर्षांपासून नीधी अभावी अपूर्ण अवस्थेत असून त्याचा उपयोग मोकाट जनावरे,कुत्रे हे वास्थव करीत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून येथील सांस्कृतिक भवन उदासिन धोरणाा मुळे अपूर्ण अवस्थेत असून या कडे कुणाचेेही लक्ष नाही,पूर्णपणे दुर्लक्ष असून फक्त कांम केल्याचा गाजावाजा करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.अशा दुर्लक्षित पणाच्या धोरणामुळे येथील जनता उदासीन आहे.या समस्या बद्दल तात्काळ दखल घेऊन वरील सांस्कृतिक भवनची दुरुस्ती करून देण्याची मागणी होत आहे.



















