पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०९.१९
वाकड- कस्पटे वस्ती येथे केटरींग काम करणार्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केटरींगचा व्यवसाय सुरू केला होता,वाकड येथील स.न.१९३/४ मधे दहा गुंठे क्षेत्र केटरिंग व्यवसायासाठी श्री. अरुण बोरीलाल खंडेलवाल यांच्याकडून सौ.भारती परशुराम गायकवाड यांनी हा प्लॉट भाडेकरार तत्वावर भाड्याने घेतला होता.काही गावगुंडांनी त्यांच्या व्यवसाय बंद करत तेथील महिलांशी अश्लील वर्तन करत धक्काबुक्की केली, येथे व्यवसाय करून देणार नाही,येथे व्यवसाय करायचा नाही इथे तुमचा काहीही संबंध नाही असे बोलत महिलांना लज्जा निर्माण होईल अशी अश्लील शिवीगाळ करत त्यांना अंगावरती साप सोडण्याची भीती दाखवत,बलात्काराची धमकी देत तेथून धुडकावून लावले व त्यांनी केलेल्या तात्पुरत्या राहण्याची सोय म्हणून तेथे तात्पुरता कंटेनर स्वरूपाचे घर केले होते व त्यात राहात त्यांनी महिलांनी व्यवसाय सुरू केला होता तो कंटेनर गायब केल्याची लेखी तक्रार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली आहे. हा सर्व प्रकार गावचे स्थनिक विशाल कलाटे व संतोष कलाटे यांच्या स्पष्ठ नामउल्लेख करून साठ ते सत्तर लोकांनी घडवून आणल्याचे तक्रारीत सौ.गायकवाड यांनी म्हटले आहे.



















