नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,शांताराम दूनबळे
दि.१.१०.१९
◆ डॉ. डी.एल.कराडासाठी सोडणार पश्चिमची जागा..
◆ जिल्ह्यात पंधरा पैकी तेरा उमेदवार वंचितचे.
नाशिक- लोकसभेच्या निवडणुकीत सर्वानाच घाम फोडणाऱ्यां वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असुन दोन्ही याद्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील एकाही जागी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार नसुन पंधरा पैकी तेरा मतदारसंघात उमेदवार जवळपास निश्चित असल्याचे सांगितले जाते तरीही शिवसेना बीजेपी,युती,काॅगेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार यादी जाहीर होण्याची प्रतिक्षेत असल्याने उमेदवारांचे नावे जाहीर केली नसल्याचे सांगितले जाते आहे.दरम्यान नाशिक मधील पश्चिम मतदारसंघात सीटुच्या डॉ.डी.एल.कराड यांच्या साठी सोडण्यात आले अशी अधिकृत माहिती वचिंत बहुजन आघाडी वरीष्ठ सुत्राकडुन सांगण्यात आले आहे.
वचिंत बहुजनआघाङीने या आठवड्यात पहिल्या यादीमध्ये २२ उमेदवार जाहीर केले लागलीच आज १४६ उमेदवार जाहीर केले आतापर्यंत १८० उमेदवार जाहीर केले असुन नाशिक जिल्ह्यातील एकाही जागी वंचितचा उमेदवाराचा समावेश नाही.दरम्यान नाशिकच्या पंधरा पैकी तेरा उमेदवारांचे नावे निश्चित आहेत, येवला आणी इगतपुरी येथून अद्याप एकही नाव पुढे आलेच नाहीत.त्यामुळे शिवसेना व बीजेपी युती व काॅगेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार यादी जाहीर होण्याकडे लक्ष लागून असल्याचे स्पष्ट झाले आहे.या पक्षांकडून नाराज उमेदवाराची आयात करून उमेदवारी देण्याची शक्यताअसल्याने नाशिक मधील जागा व उमेदवार जाहीर झाले नसुन ऊद्या सायंकाळपर्यंत उर्वरित सर्व २८८ उमेदवार जाहीर केले जाणार असल्याचे बोलले जाते आहे.



















