पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,दिलीप देहाडे
दि.१.१०.१९
बहिणीला छेडल्याच्या संशयावरून तरुणावर जीव घेणा हल्ला… पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,दिलीप देहाडे दि.१.१०.१९ पिंपरी- बहिणीला छेडल्याच्या संशयावरून तरुणावर चाकूने सपासप वार करण्याची घटना सोमवारी (दि.३०)रात्री नऊच्या सुमारास विठ्ठलनगर,पिंपरी येथे घडली.या खुनी हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला.सूरज घोडके (वय २१) रा.विठ्ठलनगर,पिंपरी असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.अजय बिराजदार (वय २२) रा. विठ्ठलनगर, पिंपरी असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सूरज घोडके याने आरोपी अजय याच्या बहिणीची छेड काढली असल्याचा संशय अजयला होता.या रागातूनच त्याने सोमवारी रात्री सूरजवर चाकूने सपासप वार केले.यामध्ये सूरज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.पिंपरी- बहिणीला छेडल्याच्या संशयावरून तरुणावर चाकूने सपासप वार करण्याची घटना सोमवारी (दि.३०)रात्री नऊच्या सुमारास विठ्ठलनगर,पिंपरी येथे घडली.या खुनी हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला.सूरज घोडके (वय २१) रा.विठ्ठलनगर,पिंपरी असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.अजय बिराजदार (वय २२) रा. विठ्ठलनगर, पिंपरी असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सूरज घोडके याने आरोपी अजय याच्या बहिणीची छेड काढली असल्याचा संशय अजयला होता.या रागातूनच त्याने सोमवारी रात्री सूरजवर चाकूने सपासप वार केले.यामध्ये सूरज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.



















