चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,योगेश्वर पि. शेंडे
दि.२.१०.१९
नागभिड- तालुक्यातील येनोली माल शाळेतील विद्यार्थांनी अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची २ ऑक्टोबर रोजी १५० वी लालबहादूर शास्त्री यांची १२५ वि संयुक्त जयंती यानिमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येनोली माल अंतर्गत गावा मधे फेरी काढुन शांततेचे सुविचार म्हणत गावातील लोकांना त्याचे संदेश व महत्व पटवुन दिले. विद्यार्थ्या महात्मा गांधींच्या जीवनावर आदारीत भाषणे सादर केली या कार्यक्रमास मा.सरपंच श्री.अमोल बावणकर,उपसरंच सौ.अर्चना मेश्राम तथा ग्रामपंचायत सर्व सदस्य व फुलझेले सर मुख्यध्यापक,वाढनकर सर,सौ.सोनटक्के मॅडम,दोडके मॅडम,महादेव सोणवाने शाळा व्यवस्थापक अध्यक्ष,तथा शाळा व्यवस्थापक सदस्य व चोकेश्वर झोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. येनोली माल येथिल बहुसंख्य शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थित मध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला.



















