पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, दिलीप देहाडे
दि.३.१०.१९
पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, दिलीप देहाडे दि.३.१०.१९ पिंपरी- राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी आज (दि.३ऑक्टो.) जाहीर केली आहे.पिंपरी मतदारसंघातून नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.राष्ट्रवादीकडून पिंपरीतून लढण्यासाठी नगरसेविका सुलक्षणा धर -शिलवंत यांच्यासह माजी आमदार अण्णा बनसोडे,नगरसेवक राजू बनसोडे,माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, गोरक्ष लोखंडे,गायक डॉ.उत्कर्ष शिंदे इच्छुक होते.त्यामध्ये धर यांना उमेदवारी मिळविण्यात यश आले आहे.संत तुकारामनगर प्रभागातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर धर नगरसेविका म्हणून महापालिकेत निवडून आल्या आहेत. पहिल्यांदाच त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत त्या उच्चशिक्षित असुन आता त्यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर सुलक्षणा धर-शिलवंत म्हणाल्या,पक्षाचे अध्यक्ष, देशाचे ज्येष्ठ नेते मा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून आभार मानत दिलेल्या संधीचे सोनं करणार असल्याचे बोलले आहे.पिंपरी- राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी आज (दि.३ऑक्टो.) जाहीर केली आहे.पिंपरी मतदारसंघातून नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.राष्ट्रवादीकडून पिंपरीतून लढण्यासाठी नगरसेविका सुलक्षणा धर -शिलवंत यांच्यासह माजी आमदार अण्णा बनसोडे,नगरसेवक राजू बनसोडे,माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, गोरक्ष लोखंडे,गायक डॉ.उत्कर्ष शिंदे इच्छुक होते.त्यामध्ये धर यांना उमेदवारी मिळविण्यात यश आले आहे.संत तुकारामनगर प्रभागातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर धर नगरसेविका म्हणून महापालिकेत निवडून आल्या आहेत. पहिल्यांदाच त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत त्या उच्चशिक्षित असुन आता त्यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली आहे.
उमेदवारी मिळाल्यानंतर सुलक्षणा धर-शिलवंत म्हणाल्या,पक्षाचे अध्यक्ष, देशाचे ज्येष्ठ नेते मा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून आभार मानत दिलेल्या संधीचे सोनं करणार असल्याचे बोलले आहे.



















