सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.३.०१०.१९
फलटण- रिपब्लिकन पक्षाने छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांची फलटण मधून बुधवारी जाहीर केलेली उमेदवारी रद्द केले आहे.भाजपमधून विरोध होत असल्याने निकाळजे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे समजते.त्यांच्या जागी महायुतीचे दिगंबर आगवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाला भाजपने सहा जागा सोडल्या आहेत.मुंबई मानखुर्द शिवाजीनगर मधून गौतम सोनवणे,पाथरी मधून आमदार मोहन फड,नायगाव मधून राजेश पवार,भंडार्यातून अरविंद भालाधरेआणि माळशिरस मधून डॉ.विवेक गुजर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.दरम्यान आज शेवटच्या दिवशी ४ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दिगंबर आगवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आ.दीपक चव्हाण हे आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.फलटण- रिपब्लिकन पक्षाने छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांची फलटण मधून बुधवारी जाहीर केलेली उमेदवारी रद्द केले आहे.भाजपमधून विरोध होत असल्याने निकाळजे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे समजते.त्यांच्या जागी महायुतीचे दिगंबर आगवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाला भाजपने सहा जागा सोडल्या आहेत.मुंबई मानखुर्द शिवाजीनगर मधून गौतम सोनवणे,पाथरी मधून आमदार मोहन फड,नायगाव मधून राजेश पवार,भंडार्यातून अरविंद भालाधरेआणि माळशिरस मधून डॉ.विवेक गुजर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.दरम्यान आज शेवटच्या दिवशी ४ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दिगंबर आगवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आ.दीपक चव्हाण हे आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.



















