चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.५.१०.१९
चिमूर- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या अर्ज छाननीत विलास डांगे,रमेश मडावी यांनी भरलेला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी रद्द केला.विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार दि.४ ऑक्टोबर पर्यंत नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर दि. ५ ऑक्टोबरला झालेल्या सर्व अर्जाच्या छाननीत धनराज मुंगले,रमेश गजभे वंचित बहुजन आघाडी व अपक्ष म्हणून अर्ज भरले होते यांनी दोन नामनिर्देशन दाखल त्यापैकी वंचित आघाडी कडून वतीने दाखल करण्यात आलेल्या अर्जात ए बी फॉर्म नसल्यामुळे हा अर्ज रद्द करून अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम करण्यात आला आहे. अर्ज छाननी नंतर चिमूर विधानसभेसाठी,बंटीभाऊ भांगडीया भाजपा,सतीश वारजूकर कांग्रेस,सुभाष पेटकर बहुजन समाज पार्टी,प्रकाश नाणे भारतीय मजुदूर किसान आघाडी,वनिता राऊत मानवता पक्ष,अरविंद सादेकर वंचित बहुजन आघाडी,अपक्ष अजय पिसे,अमृत नखाते,किशोर घोनंमोडे,कैलास बोरकर,गजेंद्र चाचरकर,धनराज मुंगले,रमेश गजभे,हरिदास बोरकर,एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. दि. ७ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेऊ शकतात.आता कोनता उमेदवार माघार घेणार याकडे चिमूर विधानसभेतील नागरीकांचे लक्ष लागले आहे.



















