चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.५.१०.१९
गडचिरोली- जिल्हातील मातृ पितृ कृपा जनकल्याण शैक्षणिक संस्था,कोटगल ता.जि. गडचिरोली व महिला व बाल कल्याण विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे कार्यालय तर्फे (दि.१७ते३०ऑक्टोबर) मंगळवार ते सोमवार राष्ट्रीय पोषण माह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील,आरमोरी, अहेरी, भामरागड,चामोर्शी,देसाईगंज, धानोरा,एटापल्ली, गडचिरोली,कोरची,कुरखेडा,मुलचेरा,सिरोंचा या तालुक्यात कलापथक जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात आला यात आपल्या कला गुणांची सादरीकरण करून आपल्या जिल्हातील मान उचविण्याचे काम ग्रामीण कलावंतानी केले त्यात प्रामुख्याने महेंद्र ठाकरे,(कलापथक प्रमुख) सुरेश कन्नमवार,शोषित खोब्रागडे, संजय खोब्रागडे,लक्ष्मी गेडाम, वैष्णवी अलाम, पुजा खोब्रागडे,सत्वशीला खोब्रागडे(आर्गांन) योगेश लाटेलवार(नाल)आनंद वाकडे यांचा प्रामुख्याने सहभाग होता.



















