सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.१०.१९
पोथरे- करमाळा मतदारसंघातील सिंचनासह सर्व प्रश्न सोडवणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांनी केले.करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असून त्याचा भाग म्हणून करमाळा तालुक्यातील कामोने येथे जाहीर सभा पार पडली. या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे राज्य सरचिटणीस पार्थ पोळके म्हणाले की सरकारने ईडी चौकशी पवार साहेबांच्या मागे लावण्यापेक्षा अल्पावधीत कोट्यावधीची संपत्ती जमवणाऱ्या सेना बीजेपी च्या उमेदवारांची चौकशी करावी. यावेळी बोलताना राष्ट्रवादी पक्षाचे नेते अँड.अजिनाथ शिंदे म्हणाले की या सरकारने शेतकरी व युवक देशोधडीला लावले असून त्यामुळे हे सरकार उलथून लावले पाहिजे. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत माने पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस पार्थ पोळक होतेे. यावेळी चंद्रकांत जगदाळे व इतर कार्यकर्त्यांची भाषणे झाली. यावेळी रा.युवक काँग्रेसचे सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष महेश काळे, युवा नेते सचिन नलवडे, उद्योजक आप्पासाहेब आहेरकर, प्रताप भोसले, मयुर जाधव, किसन गोडके,रामेश्वर लोंढे, दत्तात्रय ताकभाते, विकास गायकवाड, शिवाजी जाधव, आनंद जधाव यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे नितीनभाऊ झिंजाडे यांनी केले.



















