नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.९.१०.१९
येवला- सेना, राष्ट्रवादी, वंचित तिहेरी लढत..उमेदवारी अर्ज माघारी घेतल्या नंतर येवला लासलगाव मतदार संघात राजकीय रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतदार संघात एकूण आठ उमेदवार जरी असले तरी.वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी, आणि शिवसेना अशी तिहेरी लढत बघायला मिळणार आहे. येवला लासलगाव मतदार संघातून छगन भुजबळ हे चौथ्यांदा निवडणूक लढवित आहे. तर शिवसेनेतुन संभाजी राजे साहेबराव पवार तर वंचित बहुजन आघाडी मधून सचिन सचिन वसंतराव अलगट यांच्यात प्रमुख लढत आहे. तर उर्वरित पाच उमेदवारांपैकी बहुजन समाज पक्षाचे. एकनाथ रामचंद्र गायकवाड. अपक्ष उमेदवार विजय दत्तू सानप. संजय पोपट पवार. सुभाष भागवत (महाराष्ट्र क्रांती सेना ) महेंद्र गौतम पगारे आदी उमेदवार रिंगणात आहे.विधानसभा मतदार संघात येवले तालुक्यातील १२४ आणि निफाड तालुक्यातील लासलगाव विंचूर परिसरातील ४२ गावांचा मिळून येवला लासलगाव मतदार संघ आहे. मागील निवडणुकाच्या तुलनेत यावेळी वाढलेली नव मतदार संख्या आणि मतदान केंद्रे कुणाच्या हिताचे ठरणार आहे हे गणित मांडणे जरासे कठीण आहे.



















