सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि..१०.१०.१९.
नातेपुते- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजे यशवंत कुमार यांनी आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत मीटिंग घेतली यावेळी त्यांनी प्रचार कार्यक्रमाची आखणी व पुढील कामकाजाची रुपरेषा समजावून सांगितली यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपण शर्तीचे प्रयत्न करणार आहोत असे सांगितले आहे. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचा सत्कार करत निवडणुकी संदर्भात शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या व पक्षाचे नातेपुते शहराचे सहसचिव नारायण पवार, रोहित नवगिरे, बाबासाहेब नाईकनवरे, बबलू रणदिवे, आप्पा सावंत, पप्पू सावंत आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा विजय असो घोषणा देत मिटिंग संपन्न झाली.



















