सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.१०.०१०.१९
सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.१०.०१०.१९
सातारा- फलटण कोरेगाव मतदार संघात राजुरी ता. फलटण येथे निवडणूक भरारी पथकास ५ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. रोख रक्कम बाळगणाऱ्या व्यक्तीस रकमेचे स्पष्टीकरण न देता आल्याने सदरची रक्कम जप्त केली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप व सहाय्यक निवडणूक अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार राजुरी गावाच्या हद्दीत कुरवली पाटी येथे दि. ९ ओक्टॉबर २० रोजी सकाळी १०.५० वा. च्या सुमारास, विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या स्थायी निगराणी पथक क्रमांक १० सर्जेराव धनाजी पोतलकर वय ३१ रा. तामशेतवाडी ता माळशिरस जी सोलापूर त्यांची वेरणा गाडी क्रमांक एम एच ४५ ए डी ८९२९ गाडीने, सदाशिवनगर बाजूकडून फलटण बाजूकडे येत असताना, पथक प्रमुख आर. एच. लंगुटे यांचे पथकाने सदरील गाडी तपासणी केली असता, त्यामध्ये राजाराम शिवाजी जाधव वय वर्षे ५० रा. पुरंदावडे (सदाशिवनगर) ता. माळशिरस जि. सोलापूर यांच्या जवळ असलेल्या कापडी पिशवी ५ लाख २० हजार रुपये त्यामध्ये दोन हजार रुपयांच्या ५० नोटा, पाचशे रुपयांच्या ७०० नोटा, दोनशे रुपयांच्या २०० नोटा, शंभर रुपयांच्या ३०० नोटा अशा चलनी नोटा मिळून आल्यास सदर बाबत पथक प्रमुख यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांना काही सांगता आले नाही म्हणून सदर रकमेची रकमेचा राजुरी चेक पोस्ट तालुका फलटण येथे पथक प्रमुख कार्यक्रम गोटे कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग फलटण यांनी २ पंचा समक्ष पंचनामा करून पोलीस निरीक्षक यांचे नावे रिपोर्ट दिला असून सदर बाबत ची नोंद करून सदरची रक्कम पथक प्रमुख कार्य मोठे कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग फलटण यांच्या ताब्यात दिली आहे.सातारा- फलटण कोरेगाव मतदार संघात राजुरी ता. फलटण येथे निवडणूक भरारी पथकास ५ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. रोख रक्कम बाळगणाऱ्या व्यक्तीस रकमेचे स्पष्टीकरण न देता आल्याने सदरची रक्कम जप्त केली आहे.
निवडणुक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप व सहाय्यक निवडणूक अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार राजुरी गावाच्या हद्दीत कुरवली पाटी येथे दि. ९ ओक्टॉबर २० रोजी सकाळी १०.५० वा. च्या सुमारास, विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या स्थायी निगराणी पथक क्रमांक १० सर्जेराव धनाजी पोतलकर वय ३१ रा. तामशेतवाडी ता माळशिरस जी सोलापूर त्यांची वेरणा गाडी क्रमांक एम एच ४५ ए डी ८९२९ गाडीने, सदाशिवनगर बाजूकडून फलटण बाजूकडे येत असताना, पथक प्रमुख आर. एच. लंगुटे यांचे पथकाने सदरील गाडी तपासणी केली असता, त्यामध्ये राजाराम शिवाजी जाधव वय वर्षे ५० रा. पुरंदावडे (सदाशिवनगर) ता. माळशिरस जि. सोलापूर यांच्या जवळ असलेल्या कापडी पिशवी ५ लाख २० हजार रुपये त्यामध्ये दोन हजार रुपयांच्या ५० नोटा, पाचशे रुपयांच्या ७०० नोटा, दोनशे रुपयांच्या २०० नोटा, शंभर रुपयांच्या ३०० नोटा अशा चलनी नोटा मिळून आल्यास सदर बाबत पथक प्रमुख यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांना काही सांगता आले नाही म्हणून सदर रकमेची रकमेचा राजुरी चेक पोस्ट तालुका फलटण येथे पथक प्रमुख कार्यक्रम गोटे कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग फलटण यांनी २ पंचा समक्ष पंचनामा करून पोलीस निरीक्षक यांचे नावे रिपोर्ट दिला असून सदर बाबत ची नोंद करून सदरची रक्कम पथक प्रमुख कार्य मोठे कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग फलटण यांच्या ताब्यात दिली आहे.



















