सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.१२.१०.१९
पाटण- स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य पाटण शहर व पाटण तालुक्याच्या वतीने पाटण शहरात भव्य दिव्य अशी विर जिवाजी महाले यांची ९ आक्टोंबर २०१९ रोजी जयंती साजरी करण्यात आली.यामध्ये पाटण येथे मिरवणुकीचे उद्घाटन राज्य अध्यक्ष श्री.शंकरराव गायकवाड व जिल्हा अध्यक्ष मा.अधिकराव चव्हाण यांच्या हस्ते करुन शहरातून मिरवणूक काढण्यात आली व रणजितसिंह स्मारक हाॅल मधे सांगता सभा झाली यामध्ये राज्य अध्यक्ष श्री.शंकरराव गायकवाड संबोधन करत असताना ते म्हणाले की विर जिवाजी महाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता महाराजांना जीवदान दिले आणि त्याच जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी प्रताप गडावर जागा मिळत नाही त्या गडावरती व्यवसाय करणाऱ्या लोकांना मिळते आता तर सरकारने गड भाड्याने द्यायचे ठरवले आहे या सर्व गोष्टींसाठी गडावरती जागा आहे तर ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांजे प्राण वाचवले त्या जिवा महालेंच्या स्मारकासाठी जागा मिळत नसल्याने २०२० ची जयंती प्रताप गडावरतीच होणार आहे असे आवाहन गायकवाड यांनी केले.
यावेळी राज्य सदस्य रामभाऊ पवार यांनी सूत्रसंचालन केले यावेळी राज्य अध्यक्ष मा.श्री शंकरराव गायकवाड साहेब, सातारा जिल्हा अध्यक्ष मा.अधिकराव चव्हाण, पाटण तालुका अध्यक्ष विष्णु सपकाळ, राज्य सदस्य रामभाऊ पवार, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस बाबुराव पवार, पश्चिम महाराष्ट्र संघटक सुनिल चव्हाण,जिल्हा सदस्य निळकंठ पवार, पाटण मतदार संघ अध्यक्ष सतिश पवार, पाटण तालुका सचिव विष्णु साळुंखे, पाटण तालुका कार्याध्यक्ष पांडुरंग कानडे, पाटण तालुका खजिनदार संजय पवार, पाटण शहर अध्यक्ष वैभव पवार व पाटण तालुक्यातील सर्व विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आभार तालुका अध्यक्ष विष्णु सपकाळ यांनी मानले.



















