चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.१४.१०.१९
चिमूर- तालुक्यातील अडेगाव (देश)येथील आनंद बौद्ध विहाराचा प्रांगणात न्यू पंचशील फेडरेशन बौद्ध महासभा व रमाई महिला मंडळच्या वतीने भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या धमचक्र परिवर्तन दिनाचे दिवशी आयोजित केलेल्या प्रसिद्ध प्रबोधनकार,गायक कु.संविधान कीर्ती यांच्या समाज प्रबोधन पर्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धम्म क्रांतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी साद बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या बौद्ध धम्माचे दिक्षाची चळवळ रुजविण्याचे काम लोककवी गितकरणी केले. आजच्या गायक वर्गानी सुध्दा समाज जागृती करून आपल्या सुमधुर गीतांनी बहुजन समाजाला जागृत करण्याची खरी गरज ओळखून त्यांनी आपल्या गीतांनी नवतरूण, युवक, रमाई, भिमाई गीतांनी समाज प्रबोधन केले. भीम गीत सादर करून यांनी तरुणांमधे उत्साह त्यांच्या भीम बुद्ध गीता मधून भीम उपासक उपसीकांनी प्रेरणा निश्चित मिळणार आहे दिलखेचक भीम गीत सादर करून भिमसैनिक, लहान मुलांनी मने जिंकली, सकाळी १० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. भीम गीतानी सर्व गाव जयभीमच्या जय घोषणे करीत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.धम्म धव्यजारोहन करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता स्नेहभोजनचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास मा.नितेश गजभिये यांचा उपस्थितीत कार्यक्रमाची उदघाटन करण्यात आले.सौ संजवींनी सातरडे मॅडम, कांबळे सर, हसनराज गजभिये, ओमप्रकाश गजभिये, संजय चौधरी सरपंच, खाटूजी चौधरी, त.मु.अध्यक्ष शांताराम गजभिये, पुरुषत्तम पाटील, निरुबाई गजभिये, वर्षाताई गजभिये, शिशुपाल मेश्राम व पंचक्रोशीतील उपासक उपसकांची मोठया संख्यनी उपस्थिती होती.



















