• निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची खटाव येथे कारवाई
सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२०.१०.१९
सातारा- कातरखटाव-दहिवडी रोडवर, कात्रेश्वर मंगल कार्यालय येथे रात्री १२ वा. सुमारास संशयीत गाडी आढळली. पोलीसांनी गाडी क्र.७८८७ इनोवा या गाडीची तपासणी केली. तपासणीत ५००००० रु. ऐवढी रोख रक्कम मिळाली. तसेच गाडीमध्ये माण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांचे पाम्प्लेट व मतदारयाद्या आढळल्या. निवडणुकीत मतदारांचा हक्क वापरण्यासाठी बक्षीस देण्याच्या हेतूने ही रक्कम असल्याचे समजते. यावेळी आरोपी क्र.१) नानासाहेब महादेव मोरे व वाहन चालक आरोपी २)अजित जालींदर माळी यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.



















