नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,शातांराम दुनबळे.
दि.२८.१०.१९
नाशिक- सत्ता कवच मिळवण्यासाठी सानपाचा आटापिटा. भाजपने तिकिट नाकरल्यावर शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधून नाशिक पूर्व विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरले ले माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानतर राष्ट्रवादी काँग्रेस संघटनात्मक मोठी जबाबदारी पक्षश्रेष्ठीं सानप यांच्यावर देण्याच्या तयारीत असताना अवघ्या तीन दिवसात त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन बांधल्याने सर्वाना धक्का दिला आहे. सानप यांचे शहरात व जिल्ह्यात स्थानिक पातळीवर सेनेच्या पदाधिकार्याशी मैत्रीचे संबंध असताना या पक्षप्रवेश करतेवेळी सगळ्यांनाच अनभिज्ञ ठेवुन शिवसेना उपनेते संजय राऊत याच्या पुढाकाराने प्रवेश झाल्याने सेनेसह भाजप पदाधिकारी यांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणूक काळात सानप व राऊत यांचे भेटीमागे ज्या सेनेच्या स्थानिक मंडळीनी पाठिंबा दिला होता त्यानाही पक्षप्रवेश माहिती नसल्याने राऊत याच्या भेटीतच प्रवेश ठरल्याचा उलटसुलट चर्चा होत आहे. येवला येथील विधानपरिषदेत,शिक्षक मतदार संघात नरेंद्र दराडे व किशोर दराडे बंधुच्या विजयात सानप यांची मोलाची कामगिरी केली होती त्यामुळे भाजपाने त्यांना तिकिट दिले नसल्याचे समोर आले असल्याने पुढील महीन्यात नाशिक शहर मनपा महापौर निवडणूक होत असुन सानप याच्या तेरा नगरसेवक आहेत या नगरसेवकांच्या पाठिंब्याच्या मदतीने सेना महापौरपद ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. बाळासाहेब सानप सत्ता कवच मिळवण्यासाठी हा सारा आटापिटा करत असल्याचे यातून लपून राहिलेले नाही महानगरपालिकेत सलग पंचवीस वर्ष नगरसेवक, स्थायी समितीसभापती, महापौर उपमहापोर ते शहराध्यक्ष, आमदार असा तीस वर्षे भाजपा मध्धे राहीलेले विधानसभा निवडणुकीत माघारीच्या दिवशी उमेदवारी नाकारून मनसेकङुन आयात केलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली त्याचवेळी सानप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेऊन रिंगणात उतरले मनसे कङुन जाणीवपूर्वक निवडणूक लढवत असलेले माजी महापौर अशोक मुतॅडक यांनी माघार घेवुन सानप यांना पाठिंबा दिला अखेरीस सानप यांना सर्व थरातुन पाठिंबा मिळत गेला भाजप सेना उमेदवाराविरोधात लढत असताना सेना उपनेते संजय राऊत यांनी संपर्क कार्यालयात भेट देऊन चर्चा लक्षात घेता सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र ढिकले आणि सानप याच्यात चुरशीच्या लढतीत राहुल ढिकले यांना ८६ हजार तर सानप यांना ७४ हजार मते मिळाली व सानपाचा पराभव झाला. दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीनेट नेते छगन भुजबळ यांनी सानप यांचा सत्कार करतांना त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे असे सांगण्यात आले होते. बाळासाहेब सानप यांनी ही समंती दाखवली होती.



















