चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
चिमूर,प्रसिध्द कवी ॲड.भूपेशकुमार पाटील यांच्या ‘गाव पेटून उठतो तेव्हा’ या काव्यसंग्रहाचे लोकार्पण थायलंड देशाची राजधानी बँकॉक येथे ८ व ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपन्न होणाऱ्या पहिल्या विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलनात होणार आहे.जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उद्घाटक मलेशिया येथील जागतिक किर्तीचे साहित्यिक डॉ.डी.के.पंचामूर्ती हे आहेत. स्वागताध्यक्ष राज्यसभा सदस्य खासदार अमर साबळे असून संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत प्रा.दीपककुमार खोब्रागडे आहेत.
बँकॉक येथील नेल्सन मंडेला साहित्य परिसरात ‘सनबीम’ हॉटेलच्या सभागृहात संपन्न होणाऱ्या या पहिल्या विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलनात प्रसिद्ध कवी,विचारवंत ॲड.भूपेशकुमार पाटील यांच्या ‘गाव पेटून उठतो तेव्हा’ या काव्यसंग्रहाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.त्यांच्या या काव्यसंग्रहात ९० कवितांचा समावेश असून नागपूरच्या युरो वर्ल्ड पब्लिकेशनने त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.सुप्रसिद्ध साहित्यिक व पहिल्या विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.दीपककुमार खोब्रागडे यांची दीर्घ प्रस्तावना या काव्यसंग्रहाला लाभली आहे.पहिल्या विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलनात ॲड.पाटील यांच्या काव्यसंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त त्यांचे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाण,बोलीभाषा साहित्य संवर्धन महामंडळ,त्रैमासिक तपोभूमी परिवार,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण विकास संस्था तथा पदाधिकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.



















