पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.११.१९
पुणे- पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठीकार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला मतदारनोंदणी करण्यासाठी मुदत वाढ देण्याबाबतची काही निवेदने प्राप्त झाली होती, मात्र पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता मतदार नोंदणी करण्यासाठी मुदतवाढदेण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे पत्र मा.मुख्यनिवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाकडूनप्राप्त झाले आहे. तथापि पदवीधर-शिक्षक मतदार संघाकरिता मतदार नोंदणी करण्यासाठी दि. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत मतदार यादीत नव्याने नाव नोंदविण्याचीसंधी मिळणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी पदवीधर वशिक्षक मतदार संघ पुणे विभाग डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकाव्दारे दिली आहे



















