सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२४.११.१९
फलटण- तालुक्यातील बिबी गावच्या मोटेवाडी फाटा येथे शिवतेज ढाब्यात व पाठीमागे आडोशाला दारुची बेकायदेशीर विक्री करताना दोघेजण मिळून आल्याने त्यांच्या वर लोंणद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महेंद्र पांडुरंग काकडे (वय ४२)रावसाहेब बापू बोबडे दोघेही रा.बिबी ता.फलटण अशी त्यांची नावे आहेत. या बाबत फिर्याद पो.कॉन्स्टेबल संतोष जाधव यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली यावेळी आरोपीकडून देशी- विदेशी दारूसह एकूण ६०हजार७३८ रुपंयाचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी आधी नियम कायदा कलम ६५(ई)८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास पोलिस हवालदार भोसले करत आहेत .



















