नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.११.१९
ओझर- अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेची शाखा पंचशील नगर ओझर (मिग) ता.निफाड या ठीकाणी स्थापन करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्र जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.वसंतराव वाघ, जिल्हा कार्याध्यक्षा मा.रेखाताई मंजुळकर, मा.मनिषाताई पवार,मा.राधा क्षीरसागर, मा. रोहीणी जाधव,मा.भारती हुजरे, मा. शितल गांगोडे, मा.फौर्जना पठाण आदी उपस्थित होते. प्रथम भ.बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, राजेश्री शाहू महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा आदी राष्ट्रपुरुषाशांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या वेळी सुत्रसंचालन व बुध्द वंदना त्रिशरण पंचशील मा.गोपिनाथ वाघमारे शाखाअध्यक्ष पंचशील नगर यांनी केले. या वेळी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या पंचशील नगर महीला आघाडी च्या अध्यक्षा म्हणून सौ.राधा जितेंद्र डोळस यांची तर कार्याध्यक्षा म्हणून सौ.सुरेखाताई प्रधान यांची व सरचिटणीस म्हणून रेश्मा राजु केदारे यांची निवड करण्यात येवुन नियुक्ती पत्र देण्यात आले. ईतर कार्यकारिणी पुढील आठवड्यात या ठीकाणी समितीच्या नामफलकाचे उद्घाटन व भव्य मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी दिली. या कार्यक्रमास सौ.कमल एंगडे, सविता शिंदे, विजया भंडारे, देवुबाई चाफळकर, मिनाबाई वाघमारे, चतुराबाई गायकवाड, प्रमिला घोरपडे, मंगला आहीरे, ईत्यादीसह असंख्य महिला उपस्थित होत्या. शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



















