सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२१.११.१९
सातारा- वखार व्यावसायिकाला साग लाकडाच्या मालाचा बदली पास मिळवून देण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी शंकर जगन्नाथ आवळे रा.रघुनाथपुरा, करंजे पेठ, यांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले संशयित हा वनविभाग सातारा कार्यालयात वनपाल पदावर कार्यरत होता.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचे किरकोळ वखारीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे असणाऱ्या साग या लाकडाच्या मालाचा बदली वाहतूक पास देण्याच्या मोबदल्यात संशयिताने तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती १४ हजार रुपयांची लाच रक्कम ठरल्यानंतर संशयिताला ती रक्कम दि. २०नोव्हेबर१९ रोजी मलबेरी हॉटेल, गोडोली समोर स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याचे विरुध्द सातारा शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सातारा पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप आणि पथकाने केली.



















