सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,प्रवीण वाघमारे
दि.२४.११.१९
माळशिरस- नेहरू युवा केंद्र सोलापूर व श्री शिवछत्रपती सामाजिक बहुउद्देशीय संस्था गुरसाळे यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला व मुली करिता श्रावणी पार्लर नातेपुते येथे मोफत पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. सदर प्रशिक्षण हे तीन महिने कालावधीचे असून, प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिला व मुलींना संस्थे मार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वतः एक उद्योजकता व्हावे. हे या प्रशिक्षणाचे उद्देश आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन मा.अजित कुमार (जिल्हा समनव्य अधिकारी सोलापूर )यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे आप्पासाहेब भांड (व्यवस्थापक, भारत गॅस एजेन्सी, नातेपुते) हे उपस्थित होते. तसेच सुभाष चव्हाण, भिमराव सावंत, अक्षय भांड, रोहित नवगिरे, पांडुरंग केंगार, सागर खिलारे, सागर गोरे, सचिन भोसले, लिना जाधव, आनंदा लवटे, सारिका जाधव, वृषाली बावकर, वंदना जाधव, उषा गवळी, यावेळी उपस्थित होते. सर्व महिलांनी या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले.



















