सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.११.१९
फलटण- जिल्हा परिषद शाळा सरडे बंगला मध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून इयत्ता पहीली ते चौथी च्या मुला मुलींने व त्यांच्या सोबत मुख्याध्यापिका शिपटे व शिक्षक सायकर व कर्मचारी यांनी मिळून संविधान दिवस साजरा केला.
ज्या संविधानाच्या आधारे भारताचा कारभार चालतो काहींना ते वाचने समजून घेणे तर दूरच अशा वेळी जिल्हा परिषद शाळा सरडे बंगला येथील इयत्ता पहीली मधील तन्मय संतोष तायडे या विद्यार्थ्याने संविधानाची प्रास्ताविका सार्वजनिकरित्या वाचून हा दिवस साजरा केला.यावेळी बुध्दिस्ट प्रेरणा ग्रुप फलटण तालुका अध्यक्ष गोविंद मोरे यांच्या कडून जिल्हा परिषद शाळा सरडे बंगला येथे जाऊन शाळेतील मुलांना व नागरिकांना भारतीय संविधानाची प्रास्ताविकेच्या प्रत देऊन भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी सरडे गावचे पोलीस पाटील मनोज मोरे, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















