पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.११.१९
पुणे- स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजीक संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन व नागरिकांना वाटप करण्यात आले.तसेच सेंट्रल बिल्डिंग येथे जाऊन शासकीय अधिकाऱ्यांना संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आले व भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे,संदीप जोगदंड,सुमित गायकवाड,अमित माने,कुणाल जगताप,निर्भीड पत्रकार या वृत्तपत्राचे मुख्य संपादक नंदकुमार जोगदंड,संजीत खारवे,अमर सुर्यवंशी,अतुल गंभीरे,शासकीय अधिकारी अनिल जगताप, लोंढे,राजू रणदिवे,बसपा चे जेष्ठ नेते रमाकांत खंडे, बाळासाहेब आवारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशाच प्रकारे संघटनेच्या वतीने राज्यभरातून भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी दिली.



















