नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, शांताराम दुनबळे.
दि.२७.११.१९
सातपूर- महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या भारत देशाला सर्व समाजघटकांना, सर्व नागरीकांना समान न्याय व हक्क देणारे एक सुंदर असे संविधान दिले. त्या अनुषंगाने आज दि.२६ नोव्हेंबर२०१९ रोजी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सातपूर येथे सातपूर महानगरपालिका व शाळा क्र.२६ म.न.पा.सातपूर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस यावेळी पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. पक्षाच्या वतीने संविधान प्रास्ताविका यावेळी भेट म्हणून महानगरपालिकेस व म.न.पा.शाळेस देण्यात आली. संविधान प्रास्ताविका देतांना युवा नेते बिपिन अण्णासाहेब कटारे, नाशिक शहर उपाध्यक्ष जितू भाऊ बागुल, प्रशांत भाऊ कटारे, नाशिक शहर महिला आघाडी अध्यक्षा रेश्माताई बच्छाव, नाशिकरोड उपाध्यक्ष प्रतीक सोनटक्के, सातपूर हर्षल जाधव, योगेश चौधरी, आकाश आव्हाड, नितीन बोबडे आदी उपस्थित होते.



















