उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,इम्रान मुल्ला
दि.२७.११.१९
कळंब- शहरातील ट्रिपल सीट, विना हेल्मेट ,विनापरवाना अशा वाहनधारकांचे लक्षणिय वाढ झाल्याने अशा एकूण २६ मोटरसायकलस्वरा विरुद्ध कारवाई करून कळंब पोलीसांनी ५५०० रुपये दंड जमा केला. त्यामुळे विनापरवाना,विना हेल्मेट, ट्रिपल सीट अशा वाहन चालवणाऱ्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई पो.ना. पठाण एफ.एच व पो.काॅ. एस. बी.शेवाळे यांनी पोलिस निरीक्षक तानाजी दराने यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
या कारवाईमुळे कळंब पोलीस स्टेशन मधे अनेक लोकांची गर्दी झाली होती.



















