सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२७.११.१९
सातारा- पाडेगाव तालुका खंडाळा गाव मधे पाडेगाव पाटीजवळ निरा ते लोणंद जाणाऱ्या रोडवर क्रुझर व दुचाकीच्या अपघातात गणेश बबन आवारे (वय ३०) रा. तरडगाव तालुका फलटण हा जागीच ठार झाला याप्रकरणी क्रुझर चालकावर लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश आवारे हा दुचाकीस्वार वळवत असताना समोरून नीरा बाजूकडून येणारी क्रुझर क्रमांक एम एच ४५ एडी १३२१ चालकाने दुचाकीला धडक दिली यामध्ये गणेश आवारे गंभीर जखमी झाला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी सागर बबन खुडे यांनी फिर्याद लोणंद पोलीस स्टेशन मधे दिली अधिक तपास स.पो.नि.संतोष चौधरी करीत आहेत.



















