सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.११.१९
फलटण- लोणंद ते सातारा रस्तावरील वडुथ ते आरळी या दरम्यान रस्ता दुरुस्तीचे व खडीकरणाचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. हे काम सुरु असल्याने शिवथर कैनॉल मार्गे वाहतूक वळवली असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. खडी रस्त्यावर अंथरली असल्याने वाहन चालविणे अशक्य होते आहे.
निकृष्ट कामाची तत्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वाहन धारक करीत आहेत.



















