उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.११.१९
उस्मानाबाद- राष्ट्रीय महामार्ग २११ वरील तेरखेडा येथील नेमिनाथ गोरख कांबळे रा.तेरखेडा यांची टपरी राज पान स्टॉल येथे अन्न सुरक्षा अधिकारी उस्मानाबाद पथकाने ही कारवाई केली या कारवाईमध्ये राज पान स्टॉल टपरी तील अंदाजे किंमत १००२ रुपये व हमिद हबीब सय्यद यांची टपरी सय्यद पान स्टॉल बार्शी रोड तेरखेडा येथे अंदाजे किंमत २३८० रुपये इतक्या किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. अवैधपणे गुटखा बाळगल्याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उस्मानाबाद या दोन्ही प्रकरणातील जप्त केलेल्या गुटखा हा महाराष्ट्र शासनाद्वारे प्रतिबंधित अन्नपदार्थ असल्याची खात्री करून दि.२६ नोव्हेंबर रोजी येरमाळा पोलिस स्टेशन येथे या दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.



















