उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, अभय गायकवाड
दि.४.११.१९
उस्मानाबाद- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे चे महा संचालक कैलास कणसे (भा.प्र.से.) मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, तुषार कदम जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुक्यातील वडगांव (गां) येथे बार्टीच्यावतीने किरण चिंचोले, नागनाथ फुलसुंदर, गोविंद लोमटे यांनी संविधान साक्षर ग्राम आरोग्य डोळ्याचे शिबिर घेतले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधानातील प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून डॉ. दस्तगिर सय्यद मुजावर, आरोग्य सेवक डि.जे. कांबळे, सोसायटीचे चेअरन बिभीषण, शंकर पाटील, मुख्याध्यापक व्ही.एम. गायकवाड, अमेरिका बिराजदार, लहू गायकवड, मदार सय्यद, रामहरी माळी, समतादूत नागनाथ फुलसुंदर, किरण चिंचोले, गोविंद लोमटे, अदि उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकात किरण चिंचोले यांनी बार्टीच्या योजना सांगितले. संविधान साक्षर ग्रामचे महत्व पटवून दिले. व डॉ. दस्तगिर सय्यद यांनी डोळ्यांचे महत्व आणि घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली. या आरोग्य शीबीरास चांगला प्रतिसाद मिळाला. या आरोग्य शिबीरास १२२ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी केले तर आभार आरोग्य सेवक कांबळे डी.जे. यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहू गायकवाड, मल्लिनाथ पाटील, सुनील चिंचोले, शोभा पेटकर, अदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गावातील नागरिक, महिला,मुली, मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















