पुणे (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०२.०१.२०२०
मावळ- ECA पर्यावरण संवर्धन समिती पुणे या संस्थेकडून आयएसो मान्यताप्राप्त जि. प. प्राथ.शाळा सांगवडे तालुका मावळ याना ५ लॅपटॉप मोफत शालेय वापरासाठी देण्यात आले.
या समितीचे संस्थापक व अध्यक्ष मा विकास पाटील म्हणाले की
डिजिटल शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी व गेली वर्षभर शाळेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्धल या पर्यावरण समितीने शाळेला हे लॅपटॉप दिले आहेत सदर पर्यावरण समिती गेली दोन वर्षे सांगवडे शाळेत व सकपाळ संदीप यांच्या नेतृत्वाखाली ७ वर्ष मावळात काम करीत आहे या कार्यक्रमासाठी, ईसीए टीमचे स्वयंसेवक सिकंदर घोडके, अंजना सोनवणे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.नंदा ज्ञानेश्वर राक्षे, चेअरमन ज्ञानेश्वर राक्षे, सांगवडे गावाच्या उपसरपंच सुरेखाताई जगताप, पर्यावरण समिती शिक्षक संदीप सकपाळ, आणासाहेब ओहोळ व आदी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापक श्री सकपाळ संदीप यांनी इसीए टीमचे मनापासून आभार मानले.



















