नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०१.२०२०
नाशिक- शहरा पासुन दहा किलो मीटर अंतरावर असलेल्या मातोरीतील निर्जन, शिवगंगा फामॅ हाऊसवर कुविख्यात गुन्हेगार संदेश काजळे याच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी पहाटे पर्यंत डिजे वाजवता येत नाही म्हननाऱ्या डीजे चालक दोन तरूणांवर अमानुष मारहाण व अनैसगिॅक अत्याचार करणाऱ्या १५ जणांचा टोळक्यापैकी सहा नराधमांना ३६ तासाभरात पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व प्रत्यक्षात पिडीत तरूणांना सिव्हिल रूग्णालयात भेटून मिळालेल्या माहिती वरून आमची “भाजपाचे एक महीला आमदार नातेवाईक असुन पोलीस आयुक्त व अधिक्षक हे आम्हाला हात सुध्दा लावु शकत नाही” अशी धमकी नराधमांनी दिल्याचे पिडीतांनी उघडपणे पोलीस व प्रसार माध्यमा समोर कथन केली आहे. शिवगंगा फार्म हाऊसवर कुविख्यात गुन्हेगार संदेश काजळे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निखिल पवार यांनी पाटीचे नियोजन केले होते. डीजे चालवण्यासाठी आनंद चित्रकते यांना आॅर्डर दिली होती त्यामुळे आनंद चित्रकते, विनय पगारे, प्रथमेश खामकर हे गेले होते. रात्री ९ वाजता गर्दी जमु लागल्याने संदेश काजळे ९.३० वाजता आला त्यावेळी ३० ते ४० जणांच्या उपस्थितीत रात्री १०.३० वाजता काजळे यांनी केक कापल्या नंतर पाटी रंगु लागली मद्यधुंद अवस्थेत सारेच नाचत असताना रात्रीचे बारा वाजल्यामुळे आम्ही डीजे बंद करतोय असे सांगितल्याने उपस्थित तरूणांनी धमकवण्यास सुरुवात केली संदेश काजळे सांगेल तोपर्यंत वाजवत रहा असे सांगण्यात आले असेच हे सत्र पहाटे तीनवाजेपर्यंत चालू होते त्यानंतर मुख्य डीजे चालक आनंद चित्रकते यास संदेश काजळे याने काढून देत स्वताःच्या मोबाईलवरील गाणे डीजे ला कनेक्ट करून वाजवणे सुरू केले. त्यात व्यत्यय येत असल्यामूळे डीजे खराब आहे असे सांगत तक्रारीचा सुर व्यक्त केला. प्रथमेश खामकर जास्त बोलतो म्हणून संदेश चा भाऊ प्रितेश याने खामकर ला चापट मारली त्यानंतर धक्कादायक घटनेचा पहिला अंक सुरू झाला. संदेश, प्रितेश, सिध्देश रा.खैरे गल्ली पंचवंटी, सोनु व सॅन्डी रा.सिडको. यांच्या सह काही तरूण यांनी मारहाण केली यांत विनय पगारे यास जातीयवादी शिवीगाळ करुन अधिक मारहाण झाली आहे आळीपाळीने मारहाण केल्यानंतर संदेश काजळे याने हवेत गोळीबार करून बाहेर कुठे वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी देत अंगाला चटके देणे, अंगावर लघवी करणे,व बळजबरीने दारू पाजुन किळसवाणे अनैसर्गिक अत्याचार सुरू झाले संदेश काजळे हा झोपून गेला आणि त्यानंतर त्याच्याच काही मित्र यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर विनय व प्रितेश यास पळून जाण्यास भाग पाडले जवळपास एका चहा टपरीवर जाऊन मुख्य डीजेचालक करण शिंदे शी संपर्क साधण्यात आला त्यानतंर शनिवारी सकाळी दोन्ही पिडीत युवकांनी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि तपास करण्यात गती आली तोपर्यंत सोशल मिडीया वर घटनेचे पडसाद उमटले होते फार्म हाऊस मालक निखिल पवार यास गगांपुर येथुन महीला आमदार यांच्या निवासस्थानी गुन्हेशाखा पथकाने ताब्यात घेतले आहे, हा संशयित सबंधीत आमदार यांचा नातेवाईक आहे असे सांगत असता याबाबत आमदार यांच्या शी संपर्क साधण्यात आला असता प्रतिसाद मिळाला नाही. याप्रकरणी निखिल पवार, राजेंद्र पवार, प्रितेश काजळे, संदेश दिलीप पाटील, ज्ञानेश्वर शिरसाठ, रोहित जगदीश ङोळस, संदीप अजबराव भाळवकर, याना स्थानिक गुन्हे शाखा के के पाटील, विष्णू आव्हाड यांनी कारवाई करून अटक केली आहे पोलीस उपविभागीय अधिकारी अंरूधती राणे पुढील अधिक माहिती घेत आहे फार्म हाऊसवरील प्रकरण गंभीर आहे, संशयित यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, अॅटाॅसिटी, अनैसर्गिक अत्याचार, आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहे या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे यातुन एक ही दोषींना सोडणार नसल्याचे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ.आरती सिंह यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महात्मा फुले समता परिषदचे संतोष सोनपसारे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शशिकांत ऊनवणे, आरपीआयचे कैलास भाई पगारे, सह विविध स्तरावरील राजकिय सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस्थि स्टेशन व सिव्हिल रूग्णालयात उपस्थित होते.



















