सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१६.०१.२०२०
पाटण- वनपरिक्षेत्रातातील मौजे काळगाव-धामणी रस्त्यावर (दि.१३जाने) पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास काळगावकडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे १ वर्ष वयाच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाला. मादी बिबट्या तिच्या पील्लांसह रस्ता ओलांडत असताना भरदाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बिबट्याच्या १ वर्ष वयाच्या मादी पिल्लास धडक दिल्याने बिबट्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
वनविभागाला ही माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ जागेवर पोहचले व अज्ञात वाहनाविरुद्ध भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१ अन्वयं वन गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पाटण वनविभागाचे वनअधिकारी विलास काळे, वनपाल शुभाष राऊत, वनरक्षक अमृत पन्हाळे, बर्गे सर, बेंद्रे सर, डुबल सर, जाधवर सर, वणमजूर मुबारक मुल्ला, आबा सातपुते, भरत पाटील हे घटनास्थळी उपस्थित होते. घटनास्थळी पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी १ यांच्याकडून शविच्छेदण करण्यात आले. मा.सहा.वनरक्षक, सातारा यांचे आदेशाने १ वर्षीय बिबट्याचे दहन करण्यात आले.



















