पिंपरी (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१८.०१.२०२०
पिंपरी- संत तुकाराम नगर पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या महिंद्रा रॉयल समोर रोडवर ३१ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी पावणे सात वाजता फिर्यादी मुलीने चालत्या अॅटो रिक्षा मधून उडी मारली त्यामुळे ती जखमी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता फिर्यादी मुलगी हि अॅटो रिक्षा मधून जात होती. आरोपी समीर अब्दुल शेख (वय २६ रा. नेहरूनगर) हा अॅटो रिक्षा चालवत असताना तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता. हे तिच्या लक्षात अल्याने घाबरून मुलीने महिंद्रा रॉयल समोर रोडवर अॅटो रिक्षातून उडी मारली. त्यामुळे ति जखमी झाल्याने तिला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. तो पर्यत आरोपी हा तेथून फरार झाला होता. मुलीने स्वतःचे कागदपत्रे परत मिळतील याची दोन दिवस वाट बघितली. कागदपत्रे मिळाली नाही म्हणून अज्ञात व्यक्तीविरुद्ध संत तुकाराम नगर पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता तब्बल १८ दिवसांनी आरोपीला अटक करण्यात आले व अॅटो रिक्षा क्रमांक एम एच १४ सियू ३३१८ पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपीकडून मुलीचे बॅग, दहावी ते नर्सिंग पर्यंतचे कागदपत्रे, रोख रक्कम तीन हजार रुपये ताब्यात घेतले आहेत. आयपीसी कलम ३९२, ३३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हि कारवाई पिंपरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या संत तुकाराम नगर पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक एस.एस.जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.ए.चव्हाण, पोलिस काॅन्सटेबल खाडे यांनी केली.



















