सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.०१.२०२०
वाठार स्टेशन- भाडळे येथील बोधेवाडी घाटात जळलेल्या गाडीसह पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. सदर घटनेत चार चाकी गाडी रस्त्यावर डाव्या बाजूला जळलेल्या अवस्थेत आढळली.भाडळे येथील बोधेवाडी घाटात जळलेल्या गाडीसह पुरुषाचा खून? मृतदेह आढळला मृतदेह उजव्या बाजूला जळालेल्या अवस्थेत अर्ध नग्न असून त्याच्या डोक्यावर व अंगावर मारलेल्या जखमा दिसत असल्याने व गाडी शेजारी पँट्रोलची भरलेली बाटली व मोकळे कँन आढळून आले असल्याने हा खून असल्याचा संशय निर्माण झाला असून त्याप्रमाणे तपास पोलिसांकडून सुरू आहे.



















