चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.०३.२०२०
नागभीड- तालुक्यातील पारडी ठवरे येथील दारूबंदी महिला समिती व पोलीस पाटील यांनी अवैध दारू ची पोती त्यात ९० ml चां १६५ बोटल डोक्यावर घेऊन जात असताना अचानक पने केशव गोविंदा रामटेके व माधव विस्तारी हजारे यांना मुद्देमालासह देि ०८ मार्च रोजी सायंकाळी ९ वाजता अटक केली. रु १६५०० चां माल जप्त केला व पोलीस कोठडी वडिलांना मिळाली म्हणून
पोलीस पाटील यांची पान टपरी जाळण्यात आली. पोलीस पाटील व महिला समिती यांनी पोलीस स्टेशन नागभिड येथे महिलांनी ठाणेदार गोतमारे यांची भेट घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोलीस पाटील यांची पान टपरी जाळण्यात आली याची दखल घेत पोलीस पाटील संघटनांनी भाग घेत कार्यवाही करण्यात यावी असे सांगितले. यावेळी महिला दारूबंदी समितीच्या, शालू धूर्वे, मंदा नंडपुरकर, शालू डाखो रे, सरपंच मंगला ब्रम्हणकर, पोलीस पाटील, मानिका रंदये, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्षा रामटेके, सचिव साराये, व इतरांनी चर्चा करून कार्यवाही सुरू आहे असे सांगितले. कलम ६५ ई नुसार अप क्र ८३/२० नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास देवेंद्र येरमे पो.ह.व भोजराज मुढरे करीत आहे.



















