चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.१२.६.१९
चिमूर- पंचायत समिती चिमूर येथे इम्रान इकबाल कुरेशी जिल्हा कार्यध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) समिती तर्फे धरणे आंदोलन काढण्यात आला या आंदोलनाचा मूळ उद्देश म्हणजेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मागण्या व प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आला, या मध्ये ऐकून २८ मागण्यांची मागणी केली,व प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय चिमूर मार्फत मा.ना.देवेंद्रजी फडणवीस,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,मंत्रालय मुंबई -०३२ या मागण्या पाठवण्यात आल्या.या आंदोलना मध्ये प्रामुख्याने आपले चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते तथा गट नेता जि. पं. चंद्रपूर हे उपस्थित होते व त्यांनी आपल्या मार्गदर्शनातू तुम्ही केलेल्या मागण्याच्या पाठ पुरवठा करू व आपण जेव्हा जेव्हा मला हाक द्याल तेव्हा तेव्हा मी तुमच्या पाठीशी खणबीर पणे उभा राहणार असे उपस्थित अंगणवाडी शेविकाना संबोधित केले त्या वेळी,बालविकास प्रकल्प अधिकारी मूदखेडे साहेब,जिल्हा कांग्रेस कमेटी सरचिटणीस विजयजी गावंडे, जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान कुरेशी,माधुरीताई वीर तालुका अध्यक्ष,इंदिराताई आत्राम तालुका सचिव,सदस्या सुनिताई भोपे,मंदा आवारी, नंदा वरघणे,सुलोचना पडोळे,सविता बोरकर,कमलबाई वाकडे,अर्चना सोनवाणे,व तालुक्यातील संपूर्ण अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या,



















