पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०५.१९
पिंपरी- पुणे केरला जमातुल मुस्लीमीन तर्फे याही १९ वर्षापासून पुणे केरला जमात जकात च्या माध्यमातून रमजान ईद निमित्ताने गरजू , अंध-अपंगांना व विधवा व गरजू गोरगरीब महिलांना मदतीचा हात पुढे करत आहे, शहरात तसेच गावा-गावात पिंपरी,शिक्रापूर शिरूर,सुपा,राजगुरुनगर,येरवडा, विश्रांतवाडी,चाकण अशा अनेक ठिकाणी जाऊन गरिबांना केरला जमात मदत करत आहे.
मुस्लिम व इतर समाज बांधवांना ईद सण साजरा करण्यासाठी रेशन किट वाटप करण्यात आले. गरीब, गरजूंना रमजान रेशन किट वाटप करण्यात आले. दरम्यान २५०० गरजूंना हे रमजान किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.ओमप्रकाश पेठे,मा.एन.जी हरिदास (अध्यक्ष के.पी.एन.एस.एस)
पुणे केरला जमातुल मुस्लीमीन चे अध्यक्ष मा. ऐ.के जाफर, सेक्रेटरी व्हि.एम.कबिर,खजिनदार अॅड. करिम पुना, युवा नेते झिशान सय्यद, अॅड.मोहम्मद तारिक सिद्दिकी,काॅग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मा.शाहाबुद्दीन शेख, संजीवनी फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. इम्रान मियाँ बेग,अरीफ शेख,साहुल हामिद शेख,MIM प्रवक्ता धमराज साळवे,वंचित बहुजन आघडी महासचिव रूहीनाज शेख आदि उपस्थित होते.
मौलाना मोहम्मद अफिफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणी व्हि.एम कबिर यांनी आभार मानले.



















