सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०१.२०२०
नातेपूते- अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन होतात राज्यभर जल्लोष साजरा करण्यात आला. नातेपुते शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवून व एकमेकांना पेढे भरवून जल्लोष करण्यात आला. यावेळी धर्मा सावंत, प्रीतम साळवे, आप्पा सावंत, अरविंद सावंत, आशिष मिसाळ, आकाश मोरे, संदीप सोरटे, नागेश कोळशीरसगी, सुरज साळवे, आकाश सोरटे, श्रीमंत सोरटे, गणेश सोरटे, नारायण पवार उपस्थित होते.
या वेळी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.



















