पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.०२.७०.१९
थेरगाव- मुस्लिम समाज राहणार काळेवाडी,थेरगाव,वाकड दफनभूमीची जागेची मागणी सन २००० सालापासून तोंडी व लेखी मागणी करत आले आहेत, परंतु मुस्लिम समाजाची ही मागणी प्रशासन प्रतिनिधीकडून कानाडोळा केला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या संबंधित अनेक ठराव झाले आहेत त्यात सर्वे नंबर ८३/१ या जागेवर मुस्लिम समाजाला दफनभूमीची जागा देण्यासंबंधी ठराव संमती झाली आहे.ठराव क्र. ९१५ दि.२९.०८.१६ सभा क्र.६२ विषय क्र.६ खाते मा.आयुक्त
परंतु सदर भुखड ताब्यात घेणे कामीउदासिनता दिसून येते. तसेच २०१७ डी पी रिवाईसचे अंतर्गत सदर भूखंड या समाजाच्या आरक्षणासाठी उपलब्ध आहे. परंतु त्या संबंधी कोणतीही कारवाई करण्यात प्रशासन प्रतिनिधी हातबल आहेत. सदर भूखंड ताब्यात देऊन या समाजाला न्याय मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता शेख इरफान अब्दुल रहीम यांनी प्रशासन प्रतिनिधीकडे केली आहे.मुस्लिम समाजासाठी दफनभूमीची जागा उपलब्ध नसल्याने या समाजाला मोठ्या समस्याला सामोरे जावे लागत आहे.जागा लवकरात लवकर उपलब्ध करून न दिल्यास लवकरच मोठं जनआंदोलन करणार असल्याची माहिती निर्भिड पत्रकार प्रतिनिधी शी बोलताना शेख इरफान यांनी दिली.



















