पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.१४.०५.१९
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नंदकुमार येनपुरे दि.२२.०६.१५ पासून काम करीत आहेत, तर शिपाई संतोष तिकोणे हे २००७ पासून कार्यालयात काम करीत आहे तर दुसरे शिपाई नितीन घागरे १३.०८.१३ पासून कार्यालयात काम करीत आहे या सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी. वर्षानुवर्ष एकच एका जागेवर काम केल्याने आर्थिक हित संबंध प्रस्तापित होतात. काही वर्षापूर्वी आयुक्त कार्यालयातील राजेंद्र शिर्के हे खूप वर्षापासून आयुक्त कार्यालयात होते त्यांना दहा लाखाची लाज घेताना लाच लुचपत विभागाने पकडले होते. अशी घटना अतिरिक्त आयुक्तालय कार्यालयात घडू नये म्हणून वरिष्ठ लिपिक नंदकुमार येनवरे तसेच बारा वर्षांपासून अतिरिक्त आयुक्त कार्यालयात काम करीत असलेले शिपाई संतोष त्रिकोणी व सहा वर्ष कार्यरत असलेले शिपाई नितीन घाडगे यांची बदली करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन लोक जनशक्ती पार्टीचे धुराजी राणूजी शिंदे सचिव महाराष्ट्र प्रदेश यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताला दिले आहे.



















